नाशिक: आर्ट पेंटर कामगार संघटना, महाराष्ट्र (नाशिक) यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात नाशिक पश्चिमच्या आमदार माननीय सीमा ताई हिरे यांच्या हस्ते महाराजांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अनिल भाऊ भडांगे, माजी नगरसेवक मटाले साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नानाभाऊ महाले, आरपीआय (आठवले गट) महानगरप्रमुख आणि कपालेश्वर ट्रस्टचे सचिव माननीय प्रशांत भाऊ जाधव हे मान्यवर उपस्थित होते.
संघटनेचे अध्यक्ष कृष्णा भाऊ शिंदे, उपाध्यक्ष प्रमोद केदारे, सचिव बापू कांबळे, खजिनदार पुरुषोत्तम काळे, सल्लागार मदन प्रजापती, निवृत्ती शिंदे, संतोष पवार, विनोद उईके, काशिनाथ चारस्कर, भावसार पेंटर, सलीम पेंटर, यशवंत पेंटर, ज्ञानेश्वर लांजेवार, पेंटर भापकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी शिवचरित्राच्या प्रेरणेने समाजसेवा व राष्ट्रसेवेच्या कार्यास पुढे नेण्याचा संकल्प केला.
स्वातंत्र्य न्युज – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी