विदर्भातील मास्टेक व शंकरा फाऊंडेशन, यूएसए संस्थाचा पुढाकार

मुंबई, दि. १३ : शहरी भागातील गरजू नागरिकांना त्यांच्या स्वप्नातील घर मिळावे, यासाठी प्रत्येक तांत्रिक तज्ज्ञाने सामाजिक कार्यकर्ता म्हणून भूमिका बजवावी, असे आवाहन प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० चे अभियान संचालक तथा राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेचे मुख्य अधिकारी अजित कवडे यांनी केले.
बीकेसी येथे कोकण विभागासाठी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० संदर्भात विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे, म्हाडाचे मुख्य अभियंता आडे, वित्त नियंत्रक अजयसिंह पवार, गृहनिर्माण विभागाचे अवर सचिव रवींद्र खेतले, वरिष्ठ सल्लागार मुकुल बापट, तसेच विभागस्तरीय व शहरस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ उपस्थित होते.
योजनेच्या टप्प्यांवर भर
श्री. कवडे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रथम टप्प्यासाठी मासिक प्रगती अहवाल व जिओ टॅगिंग तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच दुसऱ्या टप्प्यासाठी लाभार्थी नोंदणी लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश दिले. गरजू नागरिकांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी व्यापक प्रचार आणि जनजागृती अभियान राबविण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० – नागरिकांचे गृहस्वप्न साकार
राज्यात २०१५ पासून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) प्रभावीपणे राबविली जात आहे. राज्यातील ३९९ शहरांमध्ये योजनेची अंमलबजावणी सुरू असून, आतापर्यंत १४.७० लाख घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी ३.७९ लाख घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे.
२०२४ मध्ये केंद्र शासनाने योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आणि १४ ऑक्टोबर २०२४ रोजी सह्याद्री येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.
योजनेच्या नव्या टप्प्यातील वैशिष्ट्ये
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत ३० ते ४५ चौ. मी. क्षेत्रफळाच्या घरे आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS) बांधली जाणार आहेत.
योजनेची अंमलबजावणी चार प्रमुख घटकांद्वारे केली जाईल :
- BLC (वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम)
- AHP (भागीदारी तत्वावर परवडणारी घरे)
- ARH (भाडे तत्वावर परवडणारी घरे)
- ISS (व्याज अनुदान योजना)
सर्वसमावेशक नागरी सुविधा
या घरकुलांसोबतच पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते, वीजपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधा पुरविल्या जातील. दिव्यांग व्यक्तींसाठी आवश्यक सुविधा, अंगणवाड्या, पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था, सौर ऊर्जा प्रणाली आणि हरित क्षेत्रासाठी स्थानिक वृक्षांची लागवडही यामध्ये समाविष्ट असेल.
MHADA आणि DMA चा समन्वय
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) आणि नगरपरिषद प्रशासन संचालनालय (DMA) यांच्या सहकार्याने ४३,९८९ कुटुंबांची नोंदणी पूर्ण झाली आहे.
हक्काच्या घरांचे स्वप्न साकार!
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत गरजू नागरिकांना परवडणाऱ्या आणि सर्व सुविधा असलेल्या घरांची संधी मिळणार आहे. राज्यातील हजारो कुटुंबांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही योजना एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
#swatantryanews#marathinews#maharashtra#