
हेमोडायलिसिस/पेरिटोनियल डायलिसिस, तीव्र इस्केमिक स्ट्रोक, उच्च रक्तदाब, संपूर्ण हिप रिप्लेसमेंट, संपूर्ण नी (गुडघा) रिप्लेसमेंट, परक्यूटेनियस ट्रांसल्यूमिनल कोरोनरी अँजिओप्लास्टी (पीटीसीए), डायग्नोस्टिक अँजिओग्राम यांसारख्या विविध उपचार सुविधा पात्र वरिष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.
आयुष्मान वय वंदना कार्डचे लाभार्थी 13,352 खासगी रुग्णालयांसह 30,072 हून अधिक रुग्णालयांमध्ये या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
योजना विस्तार आणि लाभ
भारत सरकारने 29.10.2024 रोजी आदिवासी समुदायांसह 70 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीची पर्वा न करता दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळावेत यासाठी आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) विस्तारित केली आहे.
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) ने नवीन आरोग्य सेवा संकुल (Health Benefit Package – HBP) निश्चित केले आहे, ज्याअंतर्गत 27 विशेष वैद्यकीय क्षेत्रांमध्ये एकूण 1961 उपचार प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे लाभ सर्व वयोगटांसाठी लागू आहेत.
यामध्ये हेमोडायलिसिस, पेरिटोनियल डायलिसिस, इस्केमिक स्ट्रोक, उच्च रक्तदाब, हिप रिप्लेसमेंट, नी रिप्लेसमेंट, पीटीसीए, डायग्नोस्टिक अँजिओग्राम, सिंगल व डबल चेंबर पेसमेकर इम्प्लांटेशन यांसारख्या विविध उपचार सेवा वरिष्ठ नागरिकांसाठीही समाविष्ट आहेत. याशिवाय, राज्यांना स्थानिक गरजेनुसार या आरोग्य सेवा संकुलांमध्ये सुधारणा करण्याची मुभा देण्यात आली आहे.
योजनेबाबत जनजागृती आणि मदतसेवा
ग्रामीण आणि मागास भागांमध्ये लाभार्थ्यांना त्यांचे हक्क आणि पात्रतेबाबत माहिती मिळावी यासाठी व्यापक माध्यम आणि जनजागृती धोरण राबविण्यात आले आहे. यामध्ये –
- वृत्तपत्रे, रेडिओ, नाटक, डिजिटल डिस्प्ले, दूरदर्शन आणि इतर माध्यमांद्वारे प्रचार
- आरोग्य सेवेसाठी कार्यरत आशा (ASHA), आंगणवाडी कार्यकर्त्या (AWW) आणि ग्रामस्तरीय उद्योजक यांचा समावेश
- मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक:
- 1800-110-770 वर मिस कॉल द्या
- 14555 क्रमांकावर कॉल करा (24×7 उपलब्ध)
केंद्र सरकारने सर्व राज्यांना 70 वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना विस्तारासंबंधी व्यापक माहिती, शिक्षण आणि संप्रेषण (IEC) उपक्रम हाती घ्यावेत, असे निर्देश दिले आहेत.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्री प्रतापराव जाधव यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली.
#swatantryanews#marathinews#maharashtra#