swatantryanews.com

Blog Post

swatantryanews.com > News > बातमी फोटो > सिद्धिविनायक मंदिरात नवा ड्रेस कोड लागू: श्रद्धाळूंनी शालीन वस्त्र परिधान करावेत|

सिद्धिविनायक मंदिरात नवा ड्रेस कोड लागू: श्रद्धाळूंनी शालीन वस्त्र परिधान करावेत|

मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराने आजपासून (गुरुवार) नवीन ड्रेस कोड लागू केला आहे. मंदिर प्रशासनाने सांगितले की, आता स्कर्ट, फाटलेले कपडे आणि अतिशय आकर्षक व अशोभनीय पोशाख परिधान करून येणाऱ्या भक्तांना मंदिरात प्रवेश नाकारला जाईल.

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, हे मंदिर फक्त भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरातील गणेश भक्तांसाठी श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र आहे. येथे लाखो भक्त दररोज दर्शनासाठी येतात आणि आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतात. अशा पवित्र ठिकाणी भक्तांनी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, जेणेकरून मंदिराची पावित्र्य कायम राहील.

ते पुढे म्हणाले की, मंदिरात येणाऱ्या काही भक्तांनी अन्य काही श्रद्धाळूंच्या पोशाखाबाबत तक्रारी केल्या होत्या. काही लोक अशोभनीय व अनावश्यक आकर्षक कपडे परिधान करून दर्शनासाठी येत होते, यामुळे भक्तगण अस्वस्थ होत होते. या पार्श्वभूमीवर, मंदिर ट्रस्टने हा निर्णय घेतला असून आता भक्तांनी मंदिरात येताना योग्य, पारंपरिक आणि शालीन कपडे परिधान करणे गरजेचे आहे.

हे कोणत्याही राजकीय कारणामुळे करण्यात आलेले नाही, तर श्रद्धा आणि धार्मिक भावनेशी संबंधित आहे. मंदिरात जाण्यापूर्वी स्नान करून, स्वच्छ व सुशोभित कपडे परिधान करणे ही पारंपरिक प्रथा आहे. त्यामुळेच भक्तांनी हा नियम सहजतेने स्वीकारावा व त्याचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

आचार्य पवन त्रिपाठी यांनी पुढे सांगितले की, देशभरातील अनेक मंदिरांमध्ये आधीपासूनच ड्रेस कोड लागू आहे आणि भक्त त्याचे पालनही करतात. त्याचप्रमाणे, सिद्धिविनायक मंदिरातील हा नियमही वेळेनुसार भक्तगण स्विकारतील आणि मंदिराच्या पावित्र्याचे जतन करण्यासाठी सहकार्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

#swatantryanews#marathinews#maharashtra#

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *