swatantryanews.com

Blog Post

swatantryanews.com > News > आरोग्य सेवा > दूध भेसळ तपासणीत दोषी आढळल्यास कारवाई होणार- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

दूध भेसळ तपासणीत दोषी आढळल्यास कारवाई होणार- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

दूध, अन्नपदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास १८००२२२३६५ या हेल्पलाईनवर संपर्क करावा

बई, १५:
आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले दूध लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. मात्र, राज्यात काही ठिकाणी दुधात भेसळीचे प्रकार निदर्शनास येत असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने आज व्यापक दूध भेसळ तपासणी मोहीम राबविली. यामध्ये राज्यभरातून १,०६२ दुधाचे नमुने ताब्यात घेऊन त्यांची विश्लेषणासाठी चाचणी करण्यात आली आहे.

भेसळ रोखण्यासाठी कडक पावले

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी नमूद केले की, भेसळीचा सामना करण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ आणि नियमन २०११ अंतर्गत राज्यातील नागरिकांना सकस अन्न मिळावे, यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे.

राज्यव्यापी सर्वेक्षण मोहिमेची सुरुवात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. राज्यातील १०३ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी आज सकाळी ५ वाजल्यापासून दूध उत्पादक, वितरक, विक्रेते, आणि रस्त्यावरील विक्री केंद्रांवरून नमुने गोळा केले.

दुधाचे विश्लेषण

१,०६२ नमुन्यांमध्ये ६८० पॅकिंग केलेल्या पिशव्या आणि ३८२ सुट्या स्वरूपातील दूध समाविष्ट आहे. हे नमुने अधिकृत अन्न प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले गेले आहेत. गुणवत्तेच्या निकषांवर दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

भेसळ रोखण्यासाठी प्रशासनाचे आवाहन

अन्न व औषध प्रशासन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अन्न भेसळ दिसल्यास हेल्पलाइन क्रमांक १८००२२२३६५, ईमेल jc-foodhq@gov.in, किंवा https://foscos.fssai.gov.in/consumergrievance पोर्टलवर तक्रार नोंदवावी.

सकस अन्नासाठी सातत्यपूर्ण मोहिमा

दूध भेसळ ही गंभीर समस्या असल्याचे सांगत, नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी अशा मोहिमा वारंवार राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आरोग्यासाठी निर्भेळ दूध हा प्रत्येकाचा हक्क आहे. प्रशासनाच्या या मोहिमेला नागरिकांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

#swatantryanews#marathinews#maharashtra#

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *