ग्रंथप्रेमींना सुवर्णसंधी! जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आयोजित दोन दिवसीय ग्रंथप्रदर्शन
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नाशिकमार्फत 30 व 31 डिसेंबर 2024 या दोन दिवसीय ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमाच्या निमित्ताने आयोजित या प्रदर्शनामध्ये शासकीय कार्यालये, वाचक, ग्रंथप्रेमी, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील जगताप यांनी केले आहे.
ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन 30 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता नाशिक विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे यांच्या हस्ते होईल. प्रदर्शनामध्ये विविध विषयांवरील ग्रंथ व वाङ्मयाचे प्रदर्शन होणार असून वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी विशेष उपक्रम सादर केले जातील.
प्रदर्शनातील मुख्य वैशिष्ट्ये: अशी असणार
ग्रंथसंपदेमध्ये थोर राष्ट्रपुरुषांवरील चरित्रे, कथा-कादंबऱ्या, व्यक्तिमत्त्व विकास, बाल वाङ्मय, स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ग्रंथ यांचा समावेश.
मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमधील पुस्तकांची उपलब्धता. असणार आहे.
वाचन कक्षात मोफत वाचनाची सुविधा. ऊपलब्ध असणार आहे.
वाचक सभासदत्वाची संधी: यावेळी मिळणार आहे.
शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, शाळा-महाविद्यालयातील शिक्षक-विद्यार्थी व नागरिकांसाठी वैयक्तिक वाचक सभासदत्व नोंदणी सुरू आहे. सभासदत्व घेऊन ग्रंथालयातील अमूल्य ग्रंथसंपदेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
साहित्य वाचकांसाठी स्पर्धा व सन्मान:
‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमाअंतर्गत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. या स्पर्धांतील विजेत्यांना 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनी बक्षिसे व प्रमाणपत्रे प्रदान केली जातील.
ग्रंथप्रदर्शनाला भेट द्या आणि वाचन संस्कृतीला चालना द्या!
स्वातंत्र्य न्युज नाशिक – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी.