swatantryanews.com

Blog Post

swatantryanews.com > News > कायदेशीर बाबी > शेतकऱ्यांच्या फसवणुकीला लगाम घालण्यासाठी सर्वकष कायदा येणार – कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे|

शेतकऱ्यांच्या फसवणुकीला लगाम घालण्यासाठी सर्वकष कायदा येणार – कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे|

शेतकऱ्यांची द्राक्ष व शेतीमाल विक्रीतून होणारी फसवणूक टाळण्यासाठी सर्वकष स्वरूपाचा कायदा तयार करण्याचे प्रयत्न सुरू असून, याबाबत पणन मंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल, असे प्रतिपादन कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.

नाशिकमध्ये आयोजित द्राक्ष बागायतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी आयोजित बैठकीत कृषी मंत्री श्री. कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या फसवणुकीला जबाबदार असलेल्या व्यापाऱ्यांच्या मालमत्ता सील करण्याचे निर्देश दिले. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या ४६ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये व्यापाऱ्यांच्या पार्श्वभूमी तपासण्यासाठी जागृती मोहिम राबविण्याचे आश्वासन कृषी मंत्री ॲड. कोकाटे यांनी दिले. तसेच फसवणूक टाळण्यासाठी व्यापाऱ्यांकडून सौदा पावती घेणे व पोलिस विभागाशी समन्वय साधण्याचा सल्ला दिला.

विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी शेतकऱ्यांनी फसवणुकीबाबत थेट पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रारी नोंदवण्याचे आवाहन केले. तर, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी व्यापाऱ्यांच्या पडताळणीसाठी विशेष पथक कार्यरत असल्याचे सांगितले.

द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले व सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या फसवणुकीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची मागणी केली.

बैठकीपूर्वी कृषी मंत्री ॲड. कोकाटे यांच्या हस्ते वर्ल्ड शूटिंग चॅम्पियन रूद्रांश पाटील याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशाबद्दल सत्कार करण्यात आला.

शेतकऱ्यांसाठी हा नवा कायदा फसवणूक थांबवण्यास कितपत यशस्वी ठरेल, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
स्वातंत्र्य न्युज – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *