केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री. शिवराज सिंह चौहान यांनी आज पुण्यात झालेल्या किसान सन्मान दिवसाच्या कार्यक्रमात मोठी घोषणा केली की, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्लस अंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक गरीब शेतकरी कुटुंबाला पक्के घर मिळणार आहे. यासाठी २०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्यात १९ लाख ६६ हजार ७६७ घरांचा लाभ दिला जाईल. यामध्ये ६ लाख ३७ हजार ८९ घरे पक्की घरांची योजना पूर्ण केली जाईल, तसेच १३ लाख २९ हजार ६७८ घरे नव्याने दिली जातील.
शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या योजनांचा लाभ दिला जात आहे. त्यानुसार शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार विविध योजनांची अंमलबजावणी करत आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आर्थिक तरतुदींमध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात बोलताना कृषी क्षेत्रात शाश्वतता आणण्याकरिता कृषी आणि विज्ञानाची सांगड घालणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार विविध योजनांची अंमलबजावणी करत आहे.
कार्यक्रमाच्या वेळी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी म्हणून घरकुलाच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आयसीएआरचे सहायक महासंचालक डॉ. संजय कुमार सिंह, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
“प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार, आम्ही लवकरच प्रत्येक गरीब कुटुंबाला पक्के घर देणार आहोत. या योजनेत महाराष्ट्र देशात सर्वाधिक पक्की घरे निर्माण करणारे राज्य ठरेल.”
असेही केंद्रीय कृषी मंत्री श्री. चौहान यांनी वक्तव्य केले
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले , “कृषी क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती स्वीकारावी, तसेच यांत्रिकीकरणाचा वापर करून उत्पादकता वाढवावी.”
कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजनांचा लाभार्थ्यांना सन्मान करण्यात आला, तसेच त्यांच्या अडचणी आणि अनुभव शेअर करण्याचे आयोजन करण्यात आले.
संपर्क: कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य
स्वातंत्र्य न्यूज – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी