swatantryanews.com

Blog Post

swatantryanews.com > News > महाराष्ट्र न्यूज > नाशिकमध्ये सुशासन सप्ताहाची सुरुवात | ‘प्रशासन गाव की ओर’ उपक्रम|

नाशिकमध्ये सुशासन सप्ताहाची सुरुवात | ‘प्रशासन गाव की ओर’ उपक्रम|

नाशिकमध्ये सुशासन सप्ताहाला प्रारंभ
‘प्रशासन गाव की ओर’ उपक्रम नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर

माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या सुशासन दिनाच्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यात आजपासून सुशासन सप्ताह सुरू झाला आहे. 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत सुशासन सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने ‘प्रशासन गांव की ओर’ हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह साजरा होत असून, सर्व शासकीय विभागांनी नागरिकांना पारदर्शक आणि तत्पर सेवा देण्यासाठी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली.

कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:

  1. ‘प्रशासन गांव की ओर’ अभियान:
    ग्रामीण भागात प्रशासन पोहोचवण्यासाठी सर्व शासकीय विभागांच्या सहभागातून नागरिकांना जलद आणि पारदर्शक सेवा दिली जाणार आहे.
  2. सार्वजनिक तक्रारींचे निवारण:
    सप्ताहादरम्यान नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येईल तसेच ऑनलाईन अर्ज आणि सेवांची तत्काळ पूर्तता केली जाईल.
  3. जिल्हास्तरीय कार्यशाळा:
    23 डिसेंबर रोजी आयोजित कार्यशाळेत प्रशासनाच्या नवनवीन संकल्पना व उपक्रमांचे सादरीकरण होणार आहे.

सुशासन सप्ताहाच्या माध्यमातून प्रशासन आणि नागरिकांमधील सुसंवाद वाढवणे आणि शासनाच्या योजनांचे योग्यरीतीने वितरण सुनिश्चित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

स्वातंत्र्य न्यूज – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *