नाशिक महिला व बाल विकास विभागामार्फत जिल्ह्यातील निराधार, विधवा, परित्यक्ता महिलांच्या केवळ दोन मुलींच्या विवाहासाठी ‘शुभमंगल सामूहिक/ नोंदणीकृत विवाह योजना’ राबविण्यात येते. खुला व इतर मागासवर्ग प्रवर्गातील वार्षिक ₹1 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. इच्छुक जोडप्यांनी किंवा सामूहिक विवाह राबवणाऱ्या नोंदणीकृत संस्थांनी विहित अर्ज लवकर सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
योजनेचे लाभ व वैशिष्ट्ये: अशी असणार आहे.
जोडप्यासाठी आर्थिक सहाय्य: प्रत्येक जोडप्यास ₹25,000 अनुदान.
संस्थेसाठी प्रोत्साहन: प्रत्येक जोडप्यासाठी ₹2,500 अनुदान.
किमान 5 व कमाल 100 जोडप्यांचा समावेश असलेल्या समारंभाचे आयोजन करण्याची मुभा.
वर्षातून दोन वेळाच समारंभ आयोजित करण्याची परवानगी.
विवाह सोहळ्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग व नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
अर्ज व कागदपत्रांची माहिती:
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नाशिक येथे उपलब्ध असणार आहे.
विवाह सोहळ्याच्या एक महिना आधी अर्ज व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
सामूहिक सोहळ्यात सहभागी न होता, केवळ नोंदणीकृत विवाह करणाऱ्या जोडप्यांनाही या योजनेचा लाभ घेता येतो.
संपर्क:
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नाशिक-पुणे रोड, नासर्डी पुलाजवळ, नाशिक-422011.
स्वातंत्र्य न्यूज: न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी!
#swatantryanews#marathinews#maharashtra#