swatantryanews.com

Blog Post

swatantryanews.com > News > महाराष्ट्र न्यूज > मागासवर्गीय मुलींसाठी संविधान प्रचार कार्यशाळा|

मागासवर्गीय मुलींसाठी संविधान प्रचार कार्यशाळा|

नाशिकच्या वसतिगृहात संविधान जनजागृतीला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात संविधान प्रचार कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. संविधान जनजागृतीचा संदेश देण्यासाठी आयोजित या कार्यशाळेत विद्यार्थिनींनी विविध उपक्रमांद्वारे संविधानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

कार्यशाळेचे आयोजन 8 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषीभूषण तुकाराम बोराडे, भारती विद्यापीठाचे संचालक डॉ. मेहता, समाजकल्याण विभागाचे श्री. सुलसादे, तसेच संविधान प्रचारक माधुरी शिंदे- सोनवणे, प्राजक्ता शिंदे, आणि प्रा. अशोक सोनवणे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रास्ताविकेच्या सामूहिक वाचनाने झाली. या वाचनाचा हेतू संविधानाचा आदर आणि महत्त्व विद्यार्थिनींमध्ये रुजवणे हा होता. संविधान प्रचारक माधुरी शिंदे- सोनवणे यांनी विद्यार्थिनींना संविधानाच्या ऐतिहासिक वाटचालीची माहिती दिली आणि त्याच्या मूलभूत तत्त्वांवर प्रबोधन केले.

वसतिगृहाच्या गृहप्रमुख श्रीमती विजयश्री बाबर यांनी सांगितले की, “कार्यशाळेच्या माध्यमातून मुलींना संविधानाचे महत्त्व समजावण्याचा प्रयत्न केला गेला आहे. विद्यार्थिनींनी या कार्यशाळेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.”

कार्यक्रमाचा समारोप गृहप्रमुख राजेश्वरी साखरे यांच्या उपस्थितीत आभार प्रदर्शनाने झाला.

स्वातंत्र्य न्यूज , नाशिक– न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी!
#swatantryanews#marathinews#maharashtra#

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *