मत्स्यव्यवसायासाठी सुवर्णसंधी! NFDP पोर्टलवर नोंदणी करून मिळवा योजनांचे लाभ.
नाशिक, डिसेंबर 2024:
मत्स्यव्यवसायाशी संबंधित व्यक्ती व संस्थांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्म (NFDP) वर नोंदणी करून प्रधानमंत्री मत्स्यकिसान समृद्धी सह-योजनेचे (PM-MKSSY) लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय नाशिक प्रदीपकुमार जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, NFDP हे मत्स्यव्यवसायाशी संबंधित योजनांच्या माहितीचा प्रमुख स्त्रोत असून यामुळे नोंदणीपासून ते वित्तीय प्रोत्साहनपर्यंत अनेक सुविधा एकाच ठिकाणी मिळू शकतील.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:
चालू स्थितीतील बँक खाते
आधारकार्ड
आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक
पॅनकार्ड
नोंदणी प्रक्रियेसाठी मदत केंद्र:
नाशिक जिल्ह्यातील सामाईक सेवा केंद्रांवर (CSC) जाऊन नोंदणी करता येईल. याबाबत अधिक माहितीसाठी सहाय्यक मत्स्यव्यवसाय कार्यालय, जुनी अश्विनी बॅरेक, नाशिकरोड येथे संपर्क साधावा किंवा CSC व्यवस्थापक श्री. पवार (मो. क्र. 7011998133) यांना कॉल करावा.
योजनांचे फायदे:
मत्स्यशेतीसाठी विमा संरक्षण
क्रेडिट सुविधा
ट्रेसबिलिटी प्रणाली
कामगिरीसाठी अनुदान
वित्तीय प्रोत्साहन
PM-MKSSY ची अंमलबजावणी कालावधी:
सन 2023-24 ते 2026-27 या कालावधीत केंद्रशासनाद्वारे योजना राबविण्यात येणार आहे.
NFDP वर नोंदणी ही बंधनकारक आहे!
नोंदणी केल्यानंतर मत्स्यव्यवसायाशी संबंधित व्यक्ती व संस्था योजनांचा लाभ सहज मिळवू शकतील.
“मत्स्यव्यवसायाला डिजिटल वाटचाल!”
– स्वातंत्र्य न्यूज : न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी