swatantryanews.com

Blog Post

swatantryanews.com > News > महाराष्ट्र न्यूज > “भीमशक्ती संघटना व संभाजी ब्रिगेडचे महामानवास अभिवादन” |

“भीमशक्ती संघटना व संभाजी ब्रिगेडचे महामानवास अभिवादन” |

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भीमशक्ती संघटना आणि संभाजी ब्रिगेडने स्वतंत्रपणे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले – नाशिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नाशिकच्या शिवाजी रोड येथील आंबेडकर स्मारकात, भीमशक्ती संघटना व संभाजी ब्रिगेड पक्षाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माने सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मनपा सभापती वैशालीताई भोसले, ऍड.गोरखनाथ बलकवडे, अविनाश आहेर, प्रफुल वाघ महानगर प्रमुख, नितीन रोटे पाटील , तुलसीदास तराटे मंदार धिवरे ,विकी गायधनी , अक्षय आठवले , राकेश जगताप , अनिल आहेर , निलेश गायवाड, संभाजी ब्रिगेड तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाची सांगता सामूहिक बुद्ध वंदनेने करण्यात आली. यावेळी त्रिशरण व बुद्ध वंदना घेऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

महापरिनिर्वाण दिनी भीम अनुयायांची मोठी उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला भीम अनुयायांसह बहुजन समाजातील बहुसंख्य लोक उपस्थित होते. विशेषतः मराठा तरुणांनी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा वारसा जपत एकात्मतेचा संदेश दिला.

यावेळी अनेक मान्यवरांचे विचार आणि भाषणे झालीत.
प्रफुल वाघ, नीलिमा साठे, रमेश पाथरे, रोहिणी जाधव, आणि नामदेव गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांची महत्ता पटवून देत समाजातील एकतेचे महत्व विशद केले.

या प्रसंगी , मिलिंद बाहळकर , सय्यद सर, डॉ.श्याम ओझरकर, किरण निकम, स्वप्निल गोवर्धने, सुरेश नाना पवार ,बाळासाहेब खैरनार यांसह नीलिमा साठे, रोहिणी जाधव नामदेव गायकवाड , जितेंद्र कोल्हे, भारती चित्ते, सुमन खरात, रेणुका कोकणे, रंजना नेरकर, सविता खेळणार, सविता अव्हाड , उज्वला धनगावकर तुळशीराम शिंदे , संजय तांबे अनेक कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
#swatantryanews#marathinews#maharashtra#
#महापरिनिर्वाणदिन, #डॉबाबासाहेबआंबेडकर, #भीमशक्तीसंघटना, #संभाजीब्रिगेड, #नाशिक, #शिवाजीरोड, #आंबेडकर्स्मारक, #सामूहिकबुद्धवंदना, #बहुजनसमाज, #शिवफुलेशाहूआंबेडकर, #एकात्मतेकासंदेश, #बाबासाहेबआंबेडकरविचार, #भीमनुसारअधिकार, #समाजएकता

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *