नाशिक, दि. 4 डिसेंबर 2024: मुलींच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, नाशिक येथे सहायक अधीक्षक पदासाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी 17 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन संस्थेचे संचालक मेजर (निवृत्त) एस. फिरासत यांनी केले आहे.
पदासाठी आवश्यक अटी व पात्रता:
उमेदवाराचे वय 65 वर्षांच्या आत असावे.
महाराष्ट्र नागरी सेवेतून गट ब (राजपत्रित किंवा अराजपत्रित) दर्जाचा अधिकारी म्हणून सेवानिवृत्त असावा.
शैक्षणिक संस्थेत किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.
माजी सैनिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
निवड झालेल्या उमेदवाराला महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार मासिक वेतन व भत्ते दिले जातील.
अर्ज करण्याची प्रक्रिया:
अर्ज संस्थेच्या पत्त्यावर पोस्ट किंवा कुरियरद्वारे पाठवणे आवश्यक.
अर्जाचा अंतिम तारखेनंतर (17 डिसेंबर 2024, सायं. 6 वाजेपर्यंत) आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
कामाचे स्वरूप व इतर तपशील संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.girlspinashik.com) उपलब्ध आहेत.
पत्ता:
संचालक, मुलींची सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, शासकीय दूध डेअरी समोर, पत्रकार कॉलनी, त्र्यंबक रोड, नाशिक-422002.
उत्तम संधी! पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यास चुकवू नका.
स्वातंत्र्य न्युज, नाशिक – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी.
swatantryanews #marathinews #maharashtra #सैनिकीशिक्षण #मुलींचीसंस्था #सहायकअधीक्षक #नाशिकनोकरी #नोकरीसंधी #नाशिक #मराठीबातम्या #SwatantryaNews