मुंबई – देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीपूर्वी “वर्षा” निवासस्थानावर साधू-संतांकडून अभिनंदन करणारे बॅनर झळकले आहेत. या बॅनरमध्ये फडणवीस यांना ‘धर्मरक्षक’ आणि ‘महाराष्ट्रसेवक’ या विशेषणांनी गौरवून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
हे बॅनर परम पूज्य आचार्य श्री नवपद्मसागर सूरीश्वरजी महाराज साहेब आणि विदुषी आर्या साध्वी श्री मयणाश्रीजी महाराज साहेब यांच्या वतीने उभारण्यात आले आहेत. बॅनरवरील मजकूर धार्मिक वर्तुळात लक्षवेधी ठरला आहे. त्यात म्हटले आहे:
धर्मरक्षक | महाराष्ट्रसेवक
श्री. देवेंद्र फडणवीस जी,
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा!
या अभिनंदनपर बॅनरमुळे धार्मिक समुदायाचा फडणवीस यांना मिळणारा पाठिंबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. बॅनरवर प्रसिद्ध साधू-संतांच्या नावांचा समावेश असल्याने राजकीय आणि धार्मिक वर्तुळात या घटनेची चर्चा रंगली आहे.
शपथविधीपूर्वीच फडणवीस यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल साधू-संतांमध्ये असलेला आदर व समर्थन या बॅनरमधून स्पष्टपणे दिसून येतो. या घटनेमुळे फडणवीस यांना धार्मिक पाठिंब्याचेही वलय लाभल्याचे तज्ज्ञ मानत आहेत.
स्वातंत्र्य न्युज – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी