swatantryanews.com

Blog Post

swatantryanews.com > News > ताज्या बातम्या > स्टँड अप इंडिया योजना – नवउद्योजकांसाठी सुवर्णसंधी

स्टँड अप इंडिया योजना – नवउद्योजकांसाठी सुवर्णसंधी

नाशिक, दि. 4 डिसेंबर 2024: अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांसाठी केंद्र शासनाची स्टँड अप इंडिया योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी 23 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी केले आहे.

योजनेची वैशिष्ट्ये:

अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकांतील व महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक.

कर्ज मंजुरीसाठी 10 टक्के हिस्सा अर्जदाराने भरणा करणे बंधनकारक.

योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज बँक मंजूर करेल.

उर्वरित 15 टक्के फ्रंट एण्ड सबसिडी राज्य शासनामार्फत दिली जाईल.

अर्ज कसा करावा?

अर्ज सादर करण्यासाठी अर्जदाराने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.

पत्ता:
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नासर्डी पूलाजवळ, नाशिक क्लबसमोर, नाशिक पुणे रोड, नाशिक.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा:

योजनेची अटी व शर्ती तसेच अर्ज प्रक्रियेबाबत तपशील समाज कल्याण विभागाच्या कार्यालयातून मिळवता येईल.

स्वातंत्र्य न्युज, नाशिक – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी.

swatantryanews #marathinews #maharashtra #स्टँडअपइंडियायोजना #नवउद्योजक #समाजकल्याणविभाग #नाशिक #मराठीबातम्या #मराठी

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *