“आजकाल सोशल मीडिया आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडीओ, मेसेज आणि इमेजेस व्हायरल होतात. मात्र, त्यातील सत्यता तपासण्याची गरज आहे. अनेक वेळा खोटी माहिती पसरवली जात आहे, जी समाजामध्ये संभ्रम निर्माण करते. अशा परिस्थितीत, या पोस्ट्स फॉरवर्ड करताना, त्याचा तपास करणे अत्यंत आवश्यक आहे.
संपूर्ण डिजिटल जगतामध्ये प्रत्येक गोष्टीचा ‘डिजिटल फूटप्रिंट’ असतो, जो सायबर शाखेला सहजपणे ट्रॅक करता येतो. त्यामुळे, खोटी माहिती फॉरवर्ड करणे किंवा पसरविणे, हा एक गंभीर गुन्हा ठरू शकतो. जर तुम्ही खोटी माहिती पसरवली तर तुम्हीही सहगुन्हेगार म्हणून अडकू शकता.
त्यामुळे,देवेंद्र फडणवीस यांचे हे आवाहन आहे की, कोणत्याही व्हिडीओ, मेसेज किंवा इमेज फॉरवर्ड करण्यापूर्वी त्याची खात्री करा आणि फक्त सत्य माहितीच इतरांना पसरवा. आपल्या इंटरनेट वापराची जबाबदारी आपल्यावरच आहे, म्हणून सायबर गुन्ह्यात अडकू नका आणि डिजिटल सुरक्षा लक्षात ठेवा.”
स्वातंत्र्य न्युज – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी