swatantryanews.com

Blog Post

swatantryanews.com > News > कायदेशीर बाबी > “समस्या सोडवण्यासाठी हक्कांचे हत्यार – ‘कायदा समजून घ्या, पर्व 2025!'” स्वातंत्र्य न्युज, अनोखा उपक्रम|

“समस्या सोडवण्यासाठी हक्कांचे हत्यार – ‘कायदा समजून घ्या, पर्व 2025!'” स्वातंत्र्य न्युज, अनोखा उपक्रम|

विधायक विवेकी समाज घडविण्याचे कार्य लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे असते. त्या दृषटीकोनातून नव्या युगाचे पाऊल सज्ञान भारतीय नागरिक असणार आहे.
कायदा समजून घ्या’ पर्व 2025 , या अनोख्या उपक्रमाची सुरुवात 1 जानेवारी 2025 रोजी ऍड. राजेन्द्र खंदारे अभ्यासक यांच्या सखोल अभ्यासाचे ज्ञान आपल्याला मिळणार आहे. वकील राजेंद्र खंदारे यांनी अनेक पुस्तके यावर लिहिली , यातून वकील लोकांना अनेक पक्षकारांना वाचनातून फायदा झाला
कायद्याचे ज्ञान, प्रत्येकासाठी हक्काचे शस्त्र!
नववर्षाच्या पहिल्या दिवशी, 1 जानेवारी 2025 रोजी, स्वातंत्र्य न्यूजने ‘कायदा समजून घ्या’ या विशेष पर्वाची घोषणा केली आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे सामान्य नागरिकांना कायद्याचे मूलभूत ज्ञान देणे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव होईल आणि फसवणुकीला सामोरे जाण्याचे प्रकार कमी होतील.

“कायद्याचे ज्ञान नसल्याने पावलोपावली होणाऱ्या अन्यायाला तोंड द्यावे लागते,” असे ठाम मत व्यक्त करत अ‍ॅड. राजेंद्र खंदारे यांनी या अभिनव उपक्रमाची प्रेरणा दिली. त्यांच्या सोप्या भाषेत लिहिलेल्या कायदेविषयक पुस्तकांमुळे अनेकांना स्वसंरक्षणाचे साधन मिळाले आहे.

स्वातंत्र्य न्यूज मार्फत आपल्याला
कायद्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर साध्या मराठी भाषेत माहिती ज्ञान मिळणार आहे .
कोर्ट कचेरी प्रकरणे आपल्यावर वेळ आल्यावर कशी हाताळायची,
नागरिकांना अर्ज, निवेदन, आणि कायदेशीर प्रक्रिया समजून घेण्याची संधी.
कायद्याचा वापर करून भ्रष्टाचाराविरोधात ठाम भूमिका घेण्याची प्रेरणा यातून आपल्याला प्राप्त होईल.
सबस्क्राईब करा
‘कायदा समजून घ्या’ पर्व आपल्या न्यायासाठीच्या लढाईला एक नवीन दिशा देईल.
स्वातंत्र्य न्यूज – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी! नाशिक

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *