आज दि. १८ जानेवारी २०२५ रोजी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात संभाजी ब्रिगेडने घेतलेल्या पत्रकार परिषदेत खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. गुरुमाऊली यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आणि गंभीर गैरवर्तनाचे आरोप मांडण्यात आले आहेत.
संभाजी ब्रिगेडचे महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ म्हणाले की,
मागील वर्षी सारिका सोनवणे प्रकरणात गुरुमाऊलींनी खोटे गुन्हे दाखल करून महिलेचे शोषण केले असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडने केला आहे. तसेच, धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्याशी गुरुमाऊलींचे थेट संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.’
यावेळी ब्रिगेडने सांगितले की, ‘सारिका सोनवणे यांना निलंबित करण्यात धनंजय मुंडे यांचा हात आहे. या प्रकरणात गुरुमाऊलींनी आरोपींना मदत केली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे.’
संभाजी ब्रिगेडने पत्रकार परिषदेत मांडलेल्या कागदपत्रांनुसार, ‘गुरुमाऊलींवर केलेले आरोप शंभर टक्के सत्य आहेत.’ त्यांनी गृहमंत्र्यांना या प्रकरणात कोणालाही पाठीशी न घालता कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
तृप्ती देसाई यांनी घेतलेल्या भूमिकेचे संभाजी ब्रिगेडने समर्थन केले असून, त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचा विश्वास दिला आहे.
स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी