swatantryanews.com

Blog Post

swatantryanews.com > News > समिती > श्यामभाऊ खांडबहाले- नाशिक जिल्हा बांधकाम कामगार सेना अध्यक्षपदी नियुक्ती |

श्यामभाऊ खांडबहाले- नाशिक जिल्हा बांधकाम कामगार सेना अध्यक्षपदी नियुक्ती |

शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना बांधकाम कामगार सेना प्रदेशाध्यक्ष प्रितमशेठ धारिया यांच्या नेतृत्वाखाली, राज्यभरातील बांधकाम आणि असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी श्यामभाऊ खांडबहाले यांची नियुक्ती नाशिक जिल्हा बांधकाम कामगार सेना अध्यक्ष म्हणून करण्यात आली.

राज्यातील असंघटित बांधकाम कामगार, हातमजूर आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांसाठी शिवसेना बांधकाम कामगार सेना सक्रिय झाली आहे. प्रदेशाध्यक्ष प्रितमशेठ धारिया यांनी सांगितले की, कामगारांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा, यासाठी संघटित करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

शासन नियमानुसार प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाने माथाडी कामगार नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. तसेच, बिल्डर आणि कंत्राटदारांनी कामगारांचे पीएफ, ईएसआयसी, आणि बांधकाम कामगार कल्याण महामंडळ नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे.

नाशिक जिल्ह्यातील सर्व असंघटित कामगार, हातमजूर आणि रोजंदारीवर नाक्यावर उभे राहणाऱ्या कामगारांसाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. कोणत्याही कामगाराने तक्रार केल्यामुळे त्याला नोकरीवरून कमी केले जाणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील बांधकाम कामगारांसाठी हा मोठा दिलासा असून त्यांच्या वेतन आणि हक्कांसाठी शिवसेना बांधकाम कामगार सेना सज्ज झाली आहे. लवकरच या मोहिमेचा सकारात्मक परिणाम दिसेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
स्वातंत्र्य न्युज -न्ययासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *