शिवसेना बांधकाम कामगार सेना प्रदेशाध्यक्ष प्रितमशेठ धारिया यांच्या मार्फत 36 जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती व अनेकांचे पक्ष प्रवेश करण्यात आले.
कामगारांच्या हितासाठी शिवसेनेने मोठा पुढाकार घेतल्याचे चित्र दिसत आहे.
2 फेब्रुवारी रोजी, मुंबई मंत्रालय जवळील बाळासाहेब भवन येथे घेण्यात आलेल्या राज्याच्या बैठकीस सर्व जिल्ह्यातील कामगार नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना बांधकाम कामगार सेना प्रदेशाध्यक्ष प्रितमशेठ धारिया यांच्या नेतृत्वाखाली, राज्यभरातील बांधकाम आणि असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी मोठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
राज्यातील असंघटित बांधकाम कामगार, हातमजूर आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांसाठी शिवसेना बांधकाम कामगार सेना सक्रिय झाली आहे. प्रदेशाध्यक्ष प्रितमशेठ धारिया यांनी सांगितले की, कामगारांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा, यासाठीनव्याने संघटित होऊन काम वेगाने सुरू करणे गरजेच असणार आहे.
शासन नियमानुसार प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाने माथाडी कामगार नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. तसेच, बिल्डर आणि कंत्राटदारांनी कामगारांचे पीएफ, ईएसआयसी, आणि बांधकाम कामगार कल्याण महामंडळ नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील सर्व असंघटित कामगार, हातमजूर आणि रोजंदारीवर नाक्यावर उभे राहणाऱ्या कामगारांसाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. कोणत्याही कामगाराने तक्रार केल्यामुळे त्याला नोकरीवरून कमी केले जाणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यामुळे राज्यातील बांधकाम कामगारांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या वेतन आणि हक्कांसाठी शिवसेना बांधकाम कामगार सेना सज्ज झाली आहे.
लवकरच या मोहिमेचा सकारात्मक परिणाम दिसेल, असा विश्वासही धारिया यांनी व्यक्त केला.
जिल्हयातील कामगारांनी तत्काळ जिल्हाध्यक्ष यांच्याकडे आपली नाव नोंदणी करून आपली सदस्यता शिवसेना पक्षात नोंदवावी असे आव्हान प्रदेशाध्यक्ष प्रितमशेठ धारिया यांच्याकडून करण्यात आले.
📕✒️स्वातंत्र्य न्युज – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी – मुंबई