आज ३१ जानेवारी ,पुणे येथे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दीपप्रज्वलनाने आणि राज्यागीताने ‘विश्व मराठी संमेलन २०२५’ चे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत आणि ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते संमेलनातील पहिला ‘साहित्य भूषण पुरस्कार’ मधु मंगेश कर्णिक यांना प्रदान करण्यात आला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील या सोहळ्यात हजेरी लावली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुस्तकांच्या स्टॉलना भेट देत साहित्यप्रेमींशी संवाद साधला.
तसेच राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या संकेतस्थळाच्या मराठी आवृत्तीचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले.
तसेच या संमेलनात ,लाभले आम्हास भाग्य…
मराठी अभिमान गिताच्या सुमधुर सुरांना आपल्या स्वरांनी जीवंत करत, मराठी माणसाची आव्हानांवर मात करण्याची जिद्द अधोरेखित करणारे आणि अभिमानाने मान उंचावणारे, तरुणांचे हे सादरीकरण अतिशय सुंदर आहे !
स्वातंत्र्य न्युज – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी