पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या प्रांगणात 2025 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी प्रसारमाध्यमांना संबोधित केले. त्यांनी माता लक्ष्मीचे स्मरण करून देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी समृद्धीची प्रार्थना केली.
भारताने प्रजासत्ताक दिनाच्या 75 वर्षांची वाटचाल पूर्ण केली असून, 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “सरकार मिशन मोडमध्ये काम करत आहे. देशाच्या भौगोलिक, सामाजिक आणि आर्थिक विकासाला गती मिळेल. सुधारणा, कार्य आणि परिवर्तन हे जलद विकासाचे प्रमुख घटक असतील.”
महिलांच्या सन्मानासाठी महत्त्वाचे विधेयक मांडले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, राज्य व केंद्र सरकारांनी एकत्र येऊन उत्तम कार्य करावे आणि जनतेच्या सहभागाने परिवर्तन शक्य होईल, असे ते म्हणाले.
युवकांनी विकसित भारताच्या दिशेने कार्य करावे, असे आवाहन करत पंतप्रधानांनी सर्व खासदारांना देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे सांगितले.
स्वातंत्र्य न्युज – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी