नाशिक, दि. 4 डिसेंबर 2024: अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहायता बचत गटांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मिनी ट्रॅक्टर व उपसाधन पुरवठा योजना राबवली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 23 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी केले आहे.
योजनेची काही वैशिष्ट्ये:
9 ते 18 अश्वशक्ती क्षमतेचा मिनी ट्रॅक्टर आणि उपसाधनांसाठी (कल्टिव्हेटर, रोटाव्हेटर किंवा ट्रेलर) रु. 3.5 लाख मर्यादेत अर्थसहाय्य.
90% शासकीय अनुदान आणि 10% बचत गटाचा आर्थिक हिस्सा.
अर्ज करणारा गट महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक.
गटाचे अध्यक्ष, सचिव, आणि 80% सदस्य अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकांतील असावेत.
अर्ज कार्यालयीन पत्त्यावर सादर करावा:
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नासर्डी पूलाजवळ, नाशिक क्लबसमोर, नाशिक पुणे रोड, नाशिक.
योजनेची सविस्तर माहिती व अटींच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 23 डिसेंबर 2024.
swatantryanews #marathinews #maharashtra #स्वातंत्र्यन्युज#मिनीट्रॅक्टर #अनुदानयोजना #नाशिक #समाजकल्याण #स्वयंसहायतागट #90टक्केअनुदान