मातंग आणि तत्सम जातींच्या युवक-युवतींसाठी विविध कौशल्य विकास प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, तसेच स्वंयरोजगारासाठी आर्थिक सहाय्य यांसारख्या योजना राबवल्या जात आहेत. ‘आर्टी’चे व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांनी युवकांना या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी 31 जानेवारी 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
उमेदवारांना त्यांच्या आवडीनुसार प्रशिक्षण मिळणार असून, यशस्वी उमेदवारांना नोकरीच्या संधी किंवा व्यवसायासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे.
विविध शासकीय व निमशासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मोफत पूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येईल .
पूर्वी गुगल फार्मद्वारे नोंदणी करताना तांत्रिक अडचणी येत होत्या.
आता ‘आर्टी’च्या अधिकृत संकेतस्थळावर अर्जासाठी नवीन सुविधा उपलब्ध.
अर्जाची अंतिम तारीख: 31 जानेवारी 2025
योजना मातंग आणि तत्सम जातींमधील युवकांना आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरणाच्या दिशेने पुढे नेणारी ठरेल, असे मत व्यवस्थापकीय संचालकांनी व्यक्त केले आहे.
अधिक माहितीसाठी आणि
अर्ज करण्यासाठी ‘आर्टी’च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
स्वातंत्र्य न्युज – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी.