
नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा अभिमान व्यक्त करण्यात आला. संमेलनाच्या उद्घाटनाच्या दुसऱ्या सत्रात अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी भाषण करताना मराठी भाषेच्या वाढत्या प्रभावावर भर दिला.
त्या म्हणाल्या, “मराठीचा वापर आणि व्यवहार सर्व स्तरांवर वाढला पाहिजे. प्रमाण लेखनाइतकीच बोलीभाषाही महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या भाषेला सामावून घेतल्यासच आपली भाषा अधिक समृद्ध होईल.”
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, मावळते अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, तसेच प्रा. उषा तांबे आदी उपस्थित होते.

मराठीच्या अभिजाततेचा उत्सव
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे साहित्य संमेलनात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या निर्णयामुळे मराठीला राष्ट्रीय स्तरावर अधिक मान्यता मिळेल, संशोधनाला चालना मिळेल आणि साहित्यिक वारसा अधिक समृद्ध होईल, अशी भावना साहित्यप्रेमींनी व्यक्त केली.
भविष्यातील दिशा
मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, सरकारी स्तरावर तसेच खासगी क्षेत्रातही मराठीत व्यवहार वाढवावेत, असे आवाहनही करण्यात आले. नव्या पिढीने मराठीत लेखन, वाचन आणि संभाषण अधिकाधिक करावे, असे मत तज्ज्ञांनी मांडले.
मराठी भाषेच्या या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी संमेलनात मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी आणि अभ्यासक सहभागी झाले आहेत.
#अखिलभारतीयमराठीसाहित्यसंमेलन
#उत्सवअभिजातमराठीचा
#अभामसासं
#मराठीभाषा
#swatantryanews#marathinews#maharashtra#