“इस्पेलिअर स्कूलचे कर्मचारी भारत दत्तात्रय खताळे यांना शिवसेना माजी नगरसेविका सौ .हर्षदा ताई गायकर व समाधान गायकर यांच्या हस्ते 26 जानेवारी ध्वजारोहणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते ग्रीन जिमच्या फलकाचे उद्घाटनही करण्यात आले. या सन्मानाबद्दल त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले.
भारत खताळे यांना वेळोवेळी जिंदाल सॉ लिमिटेडचे रिटायर्ड प्रेसिडेंट डी.सी. सिन्हा आणि ट्रान्सपोर्ट मॅनेजर भावेश सर यांचे मोलाचे योगदान आणि शोएब मिर्झा आणि रोहित जाधव यांचे सहकार्य लाभले.
तसेच आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक, मित्रपरिवार, तसेच कुटुंबीयांचे सहकार्य यशाचे मुख्य आधार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी यावेळी तिरंग्याच्या साक्षीने जाहीरपणे आश्वासन दिले की पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय तिरंगा अभिमानाने फडकवण्याचा निर्धार ते नक्कीच पूर्ण करतील.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.”
स्वातंत्र्य न्युज,मुंबई – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी.