निफाड तालुक्यातील दिव्यांग खंडू कोटकर यांनी भारत विरुद्ध नेपाळ क्रिकेट स्पर्धेमध्ये विजय मिळवलेला आहे.
राष्ट्रीय पातळीवर पाच वर्ष सलग झुंज देत असलेले खंडू कोटकर आज विजयाचा स्तंभ घेऊन नाशकात परत आले.
आपल्या प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत खंडू कोटकर आपल्या मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर स्थान निर्माण केले आहे.
नेपाळ येथे पोखरा परिसरात झालेल्या आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये दिव्यांगांची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेमध्ये तिन्ही सामने खंडू कोटकर यांच्या टीमने जिंकले.
महाराष्ट्रातील चार खेळाडूंचा यामध्ये समावेश होता त्यापैकी खंडू कोटकर नाशिक , संजय चव्हाण नांदेड , सौरभ पाटील सांगली, राहुल पाटील सांगली, हे महाराष्ट्रातील दिव्यांग आंतरराष्ट्रीय खेळाडू विजयी झाले आहेत.
भारताची शान राखत या दिव्यांग खेळाडूंनी आपला विजयाचा स्तंभ नेपाळमध्ये देखील रोवला.
पाच वर्षापासून दिव्यांग क्रिकेट असोसिएशन नाशिक यांचे संचालक असलेले खंडू कोटकर अनेक दिव्यांग खेळाडूंना संधी देण्याचे काम प्रशिक्षण देण्याचे काम अनेक वर्षांपासून करत आहेत.
भारतीय दिव्यांग बोर्डाने नेपाळ दौऱ्यासाठी खंडू कोटकर यांची पाच वर्षानंतर निवड केली, ही निवड सार्थकी लागली असे म्हणायला हरकत हरकत नाही.
स्वातंत्र्य न्युज — न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी