swatantryanews.com

Blog Post

swatantryanews.com > News > व्हिडिओ > पन्नास वर्षांनी बालमित्र एकत्र – आठवणींचा जल्लोष!

पन्नास वर्षांनी बालमित्र एकत्र – आठवणींचा जल्लोष!

“पन्नास वर्षांपूर्वी एकाच शाळेच्या छताखाली शिकणारे बालमित्र आज पुन्हा एकत्र आले आहेत!

घोटीच्या जनता विद्यालयातील 1974-75 च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी गोंदे येथे स्नेहसंमेलन भरवले. जुन्या आठवणींना उजाळा देत, शिक्षकांचा सन्मान करत आणि शालेय जीवनाच्या गोड-तुरट आठवणींना उजाळा देत या कार्यक्रमाचा उत्साह ओसंडून वाहत होता.

“सोशल मीडियामुळे हरवलेली नाती पुन्हा जुळली, आणि मित्रांचे प्रेम अधिक घट्ट झाले!”

कार्यक्रमात तत्कालीन शिक्षक गोरा अहिरे, कृष्णराव शिंदे, सुरेश धारणकर, वजनकर यांनी आपल्या भाषणांतून विद्यार्थ्यांच्या आठवणी जागविल्या. शालेय जीवनातील किस्से, खेळ, गमती-जमती यांची रंगतदार चर्चा रंगली.

कार्यक्रमाच्या नियोजनात एडवोकेट राजेंद्र खंदारे, विजय अवसरकर, नंदलाल गौंड यांचा महत्त्वाचा सहभाग होता. उपस्थितांमध्ये राजेंद्र चांडोले, तुकाराम जगताप, कांतीलाल पिचा, शिवाजी कस्तुरे, हंसराज कुमट, रमेश परदेशी यांसारख्या अनेक माजी विद्यार्थ्यांचा समावेश होता.

“आजच्या पिढीने या घटनेतून शिकावे – नाती टिकवावी, संवाद जपावा आणि मैत्रीची खरी मजा अनुभवावी!”

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी पुन्हा भेटण्याचे आश्वासन देत आनंदाने स्नेहसंमेलनाचा समारोप केला

स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *