swatantryanews.com

Blog Post

swatantryanews.com > News > आरोग्य सेवा > नेत्रदानासाठी राज्यपालांचे आवाहन: नॅबच्या ७४ व्या स्थापना दिन सोहळ्यात मार्गदर्शन|

नेत्रदानासाठी राज्यपालांचे आवाहन: नॅबच्या ७४ व्या स्थापना दिन सोहळ्यात मार्गदर्शन|

मुंबई: नेत्रदानामुळे दृष्टिहीन व्यक्तींना नवी दृष्टी मिळू शकते, असे सांगत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी स्वतःसह कुटुंबातील सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. अधिकाधिक लोकांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (नॅब) संस्थेच्या ७४ व्या स्थापना दिन सोहळ्यात केले.

नॅबचा स्थापना दिन सोहळा सोमवारी (दि. २०) वरळी, मुंबई येथील संस्थेच्या सभागृहात पार पडला. या संस्थेने दृष्टिहीन व्यक्तींच्या शिक्षण, पुनर्वसन व रोजगारासाठी भरीव कामगिरी केली आहे.

राज्यपालांनी आपल्या भाषणात माजी राज्यपाल रमेश बैस यांनी नॅबसाठी ब्रेल प्रिंटिंग प्रेस खरेदीसाठी केलेल्या आर्थिक सहाय्याचा उल्लेख केला. तसेच, भविष्यात देखील राजभवन संस्थेच्या कार्याला पाठिंबा देईल, असे त्यांनी आश्वासन दिले.

ब्रेल प्रिंटिंग प्रेस, टॉकिंग बुक्स, परफ्युमरी प्रशिक्षण आणि शिक्षक प्रशिक्षण यांसारख्या उपक्रमांमुळे नॅबने दृष्टीहीन व्यक्तींना सन्मानाने जीवन जगण्यास सक्षम केले आहे, याबद्दल राज्यपालांनी संस्थेचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाला नॅबचे अध्यक्ष हेमंत टकले, मानद महासचिव हरिंदर कुमार मल्लिक, कार्यकारी महासचिव डॉ. विमल देंगडा, कार्यकारी संचालक पल्लवी कदम, तसेच संस्थेचे विद्यार्थी आणि आश्रयदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी विविध पारितोषिकांचे वितरणही करण्यात आले.
स्वातंत्र्य न्युज – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *