swatantryanews.com

Blog Post

swatantryanews.com > News > गुप्त बातम्या > नाशिक मध्ये बेकायदेशीर बायनरी, क्राउड फंडिंग स्किमचा पर्दाफाश, स्वातंत्र्य न्युज स्टिंग ऑपरेशन.

नाशिक मध्ये बेकायदेशीर बायनरी, क्राउड फंडिंग स्किमचा पर्दाफाश, स्वातंत्र्य न्युज स्टिंग ऑपरेशन.

नाशिकच्या चांडक सर्कल परिसरात एका बेकायदेशीर पिरॅमिड स्कीमचा पर्दाफाश झाला. या स्कीममुळे अनेक तरुणांचे आर्थिक शोषण होण्याची शक्यता होती. स्वातंत्र्य न्यूजचे संपादक, स्वप्निल गोवर्धने यांनी या गैरव्यवहाराविरोधात आवाज उठवला आणि थेट पोलिसांना पाचारण करून संपूर्ण प्रकरण उघड केले.

स्वप्निल गोवर्धने यांना त्यांच्या ओळखीतून सचिन बोरसे यांनी संपर्क साधला होता. बोरसे यांनी “केवळ ५०० रुपये गुंतवून करोडपती होण्याची संधी” असल्याचे सांगितले. चांडक सर्कलजवळील रेखा नावाच्या दुकानात गर्दी दिसल्यावर गोवर्धने यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तरुणांना बोर्डवर वही व पेनसह ‘एजंट स्कीम’ समजावताना आढळले. गोवर्धने यांना देखील ५०० रुपये भरून “काहीही काम न करता” कमाईचे स्वप्न दाखवले गेले.

त्यानंतर गोवर्धने यांनी तातडीने ११२ क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना बोलावले. मुंबई नाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांसमोर कंपनीचा प्रतिनिधी संजय वाघ यांनी “साखळी पद्धतीने पैसे कसे जमा होतात व कसे करोडपती होता येते” हे उघडपणे सांगितले. यामध्ये कोणत्याही प्रकारचे वैध परवाने नसल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी प्रमुख गैरव्यवहार:

  1. नागरिकांना ५०० रुपये भरण्यास प्रवृत्त करून पिरॅमिड स्कीम राबवणे.
  2. कोणतीही अधिकृत परवानगी नसताना आर्थिक व्यवहार करणे.
  3. फसव्या आश्वासनांद्वारे मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक करणे.
  4. QR कोडद्वारे पैसे गोळा करून त्यांचा स्रोत लपवणे.
  5. भारतीय कायद्यांचे उल्लंघन करणारे व्यवहार आणि अनधिकृत वेबसाईटद्वारे क्राउड फंडिंग.

मागणी आणि पुढील कारवाई:

स्वप्निल गोवर्धने यांनी संबंधित व्यक्ती आणि कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणातील प्रमुख व्यक्तींवर कठोर कारवाई करावी आणि कंपनीची वेबसाईट तातडीने बंद करण्याचे आदेश द्यावेत, असे त्यांनी मुंबई नाका पोलिस निरीक्षक संतोष सर यांच्याकडे लेखी तक्रारीत नमूद केले आहे.

सरकार आणि पोलीस प्रशासनाला विनंती:

अशा पिरॅमिड स्कीम कंपन्यांवर तातडीने बंदी घालावी.

अनधिकृत आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करून संबंधितांना शिक्षा द्यावी.

जनतेच्या मानसिक व आर्थिक नुकसानीसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी.
नाशिक जिल्ह्यातील लोकांना असे अनेक कंपन्यांनी करोडोंचा गंडा घातला आहे तसेच अनेक निष्पाप जीव देखील गेले आहे. कर्जबाजारी झाल्यामुळे अनेक लोक आत्महत्येस बळी पडली आहे. त्यामुळे प्रशासनाने गंभीर निर्णय घेणे गरजेचे आहे.

घटनेची सर्व पुरावे: उपलब्ध आहेत

घटनास्थळावर घेतलेले फोटो आणि व्हिडिओ प्रशासनास सादर करण्यात येतील.
स्वातंत्र्य न्युज संपादक – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *