नाशिक, 31 डिसेंबर: रोजी
प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही नाशिक जिल्हा नशाबंदी मंचने 31 डिसेंबर रोजी गाडगे महाराज पुतळा, मेनरोड येथे नशामुक्त भारताचा संदेश देत एक अनोखा उपक्रम राबवला. समाजातल्या विनाशक वृत्तींचे प्रतीक म्हणून दारूच्या बाटल्या आणि सिगारेट ओढणाऱ्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
या प्रसंगी तरुणांना आवाहन करण्यात आले की, “विनाशक वृत्तीचे दहन होवो आणि विधायक विवेकी समाज घडो.”
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नशाबंदी मंचचे अध्यक्ष माननीय माने सर, अविनाश आहेर, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा वारसा जपत, निर्व्यसनाचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
मान्यवरांचे विचार अन् जनसमुदायाचा प्रतिसाद मोठ्या संख्येने लाभला
कार्यक्रमात नीलिमा साठे, रमेश पाथरे, रोहिणी जाधव, मिलिंद बाहळकर, सय्यद सर, डॉ. श्याम ओझरकर, किरण निकम, सुरेश नाना पवार, स्वप्निल गोवर्धने , बाळासाहेब खैरनार, जितेंद्र कोल्हे, भारती चित्ते यांसह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत बहुसंख्य नागरिकांनी हजेरी लावली. “नशामुक्त समाज घडवण्यासाठी पुढाकार घेऊ या,” असे एकमुखाने सांगण्यात आले.
समाजातील विनाशक प्रवृत्तींचे दहन करून सकारात्मक विचारांची रुजवात करण्याचा हा उपक्रम नाशिककरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
स्वातंत्र्य न्युज नाशिक – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी