राजूर बहुला, पिंपळद, सारूळगाव या तीन गावांमध्ये अनधिकृत कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रदूषण निर्माण केले असून, प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ३० ते ३५ कंपन्या पूर्णपणे बेकायदेशीररित्या सुरू असून, त्यांच्याकडून कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही.
ग्रामपंचायत आणि ‘स्वातंत्र्य न्यूज’चे संपादक स्वप्निल गोवर्धने यांनी याविरोधात तक्रार अर्ज दिला असूनही, प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नाही.
MECB ने वीजपुरवठा कसा दिला?
ग्रामस्थांचा प्रश्न असा आहे की, या कंपन्यांना वीजपुरवठा करण्यापूर्वी MECB ने कोणती अधिकृत कागदपत्रे तपासली?
✅ या कंपन्यांची कोणतीही अधिकृत नोंदणी नाही!
✅ GST क्रमांक नाही!
✅ कंपाऊंड किंवा अधिकृत कार्यालय नाही!
✅ वाहनांवर नंबर प्लेट नाहीत!
वाहतुकीला नियम नाही, पोलिस प्रशासन गप्प का?
✅ बेकायदेशीर खनिज वाहतूक करणाऱ्या गाड्यांना नंबर प्लेट नाहीत.
✅ वाहतुकीच्या कोणत्याही नियमांचे पालन नाही.
✅ ग्रामीण पोलिस प्रशासन सर्व बघूनही कारवाई करत नाही.
सरकारी यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड!
✅ ग्रामपंचायत परवानगीशिवाय कंपन्या कशा चालतात?
✅ प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे लक्ष का देत नाही?
✅ खनिकर्म विभाग, महसूल विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय का गप्प आहे?
३ गावांमध्ये भर दिवसा कडक उन्हात नवीनच शक्कल लढविली आहे . तलाठी ग्रामसेवक मंडलाधिकारी यांनी , पाण्याचा टँकर रस्त्यावर पाणी मारण्यासाठी सोडला आहे. दररोज पाणी जोरदार मारले जात आहे , यातून पाण्याची टंचाई मोठी होणार आहे. धूळ उडू नये म्हणून हा उपाय म्हणजे जगावेगळा अभ्यास आहे.
प्रशासनाने जबाबदारी घेऊन वेळीच अशी यंत्रणा आटोक्यात आणावी अन्यथा अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याचे चिन्ह नाकारता येत नाही.
ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांनी याप्रकरणी १७ जानेवारीला जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, मुख्यमंत्री, महसूल व पर्यावरण मंत्री यांना निवेदन दिले.
मात्र, अद्याप कुठल्याही अधिकाऱ्याने साधी विचारपूस देखील केलेली नाही.
✅ या बेकायदेशीर कंपन्या तात्काळ बंद कराव्यात.
✅ सर्व अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी.
✅ अनधिकृत कंपन्यांचा तपास करून जबाबदारांवर कारवाई करावी.
“नाशिक जिल्ह्यातील राजूर बहुला, पिंपळद, सारूळगाव या तीन गावांमध्ये तब्बल ३०-३५ कंपन्या बेकायदेशीररित्या सुरू असून, प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून गप्प आहे. ग्रामस्थ आणि ‘स्वातंत्र्य न्यूज’ संपादक स्वप्निल गोवर्धने यांनी तक्रार अर्ज दिला असतानाही कारवाई होत नाही. या कंपन्यांना वीजपुरवठा कसा मिळाला? वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन सर्रास सुरू असून, पोलिस प्रशासन देखील गप्प असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. सरकारने तातडीने कारवाई करावी!”
स्वातंत्र्य न्युज — न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी