swatantryanews.com

Blog Post

swatantryanews.com > News > शेतकरी बातम्या > नाशिककरांचा विश्वास – रोटरी शेतकरी बाजाराचा सात वर्षांचा यशस्वी प्रवास!

नाशिककरांचा विश्वास – रोटरी शेतकरी बाजाराचा सात वर्षांचा यशस्वी प्रवास!

स्वच्छ व सेंद्रिय उत्पादनांचा विश्वास: रोटरी शेतकरी बाजार नाशिककरांची पसंती रोटरी शेतकरी बाजार, नाशिककरांसाठी शुद्धतेचा विश्वास! ठरला आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा अनोखा उपक्रम नाशिक मध्ये,
रोटरी शेतकरी बाजाराची सात वर्षांची यशस्वी वाटचाल!

नाशिकच्या रोटरी क्लबने सुरू केलेला रोटरी शेतकरी बाजार गेल्या सात वर्षांपासून नाशिककरांच्या हृदयात घर करून आहे. ऑरगॅनिक सर्टिफिकेटधारक शेतकऱ्यांना एकाच छताखाली आणण्याच्या या उपक्रमामुळे ग्राहकांना दर्जेदार आणि केमिकल-रहित उत्पादने उपलब्ध झाली आहेत.

सध्या हा बाजार गंगापूर रोडवरील उदोजी महाराज म्युझियम येथे दोन वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. सकाळी ९ ते १२ या वेळेत हा बाजार भरतो. दर रविवारी भरणाऱ्या या बाजारात सकाळी ७ वाजल्यापासूनच ग्राहकांच्या रांगा लागतात, आणि अवघ्या दोन तासांत सेंद्रिय माल विक्री संपतो.
बाजारात सेंद्रिय तृणधान्ये, भाजीपाला, फळे, सेंद्रिय गूळ, लाकडी घाणा तेल, साबण, हळद, अंडी मशरूम, तृण धान्ये बिस्कीट तसेच अनेक आरोग्यवर्धक उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.

रोटरी प्रकल्प संचालक हेमराज राजपूत यांच्या कल्पकतेतून सुरू झालेल्या या बाजाराचे व्यवस्थापन माजी अध्यक्ष मनीष चिंधडे, डॉ. श्रिया कुलकर्णी, मुग्धा लेले, सीए प्रफुल बर्डिया, चालू वर्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश रावत सचिव शिल्पा पारख ,शेतकरी बाजाराचे चेअरमन चेतन पवार, व रोटरी सभासद रफीक व्होरा आणि सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली होते.

या बाजारामुळे शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव तर ग्राहकांना शुद्ध व सेंद्रिय उत्पादने मिळतात, यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळत आहे.
या वेळी रोटरीचे पदाधिकारी , शेतकरी आणि ग्राहकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *