महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने नवलेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी अनुदान योजनेंतर्गत अर्ज मागवले आहेत. या योजनेअंतर्गत 1 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत नवलेखकांनी आपले साहित्य मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर इमारतीत पाठवावे, असे आवाहन मंडळाचे सचिवांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
सहा वाङ्मय प्रकारांना मिळणार अनुदान
नवलेखकांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी पुढील वाङ्मय प्रकारांना अनुदान देण्यात येणार आहे:
📕कविता: 64 ते 96 पृष्ठे (80 कविता)
📕 कथा: 128 ते 144 पृष्ठे (45000 शब्दांपर्यंत)
📕 नाटक/एकांकिका: 64 ते 96 पृष्ठे (28000 शब्दांपर्यंत)
📕कादंबरी: 128 ते 144 पृष्ठे (45000 शब्दांपर्यंत)
📕बालवाङ्मय: 64 ते 96 पृष्ठे (28000 शब्दांपर्यंत)
📕वैचारिक लेख, ललित लेख, चरित्र, आत्मकथन, प्रवासवर्णन: 128 ते 144 पृष्ठे (45000 शब्दांपर्यंत)
साहित्याच्या किमान आणि कमाल पृष्ठसंख्येची मर्यादा कटाक्षाने पाळावी.
अयोग्य पृष्ठसंख्येचे साहित्य स्वीकारले जाणार नाही.
योजनेसंबंधी माहितीपत्रक व अर्ज महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर ‘Navlekhak Grant Scheme Rules Book and Application Form’ या शीर्षकाखाली उपलब्ध आहे.
पत्ता: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर, दुसरा मजला, प्रभादेवी, मुंबई – 400 025.
संपर्क: 2432 5931.
नवलेखकांसाठी ही योजना एक प्रेरणादायी पाऊल आहे, ज्यामुळे साहित्यिक क्षेत्रात नव्या प्रतिभांना संधी मिळेल. 31 जानेवारी 2025 ची अंतिम मुदत लक्षात ठेवा आणि आपले साहित्य पाठवून साहित्य क्षेत्रात पहिले पाऊल टाका!
स्वातंत्र्य न्युज – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी.