“महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे जिथे गुन्हे तपासासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनची सुविधा सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे या व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. राज्यात २५९ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात येणार आहेत, त्यापैकी २१ व्हॅन्स कार्यान्वित झाल्या आहेत. क्राईम सीन ॲप्लिकेशन आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्ह्यांच्या तपासात ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
#swatantryanews#marathinews#maharashtra#