swatantryanews.com

Blog Post

swatantryanews.com > News > ताज्या बातम्या > जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावणे अनिवार्य: परिवहन विभागाचे आवाहन|

जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावणे अनिवार्य: परिवहन विभागाचे आवाहन|

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी तयार झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (हाय सिक्युरिटी नंबर प्लेट) लावणे बंधनकारक केले आहे. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी वाहनमालकांना या निर्णयाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

उच्च सुरक्षा नंबर प्लेटमुळे वाहनांची ओळख पटवणे, बनावटगिरी रोखणे, तसेच वाहने चोरीस किंवा गुन्हेगारीसाठी वापरणे टाळणे शक्य होणार आहे. 1 एप्रिल 2019 नंतर तयार झालेल्या वाहनांवर ही प्लेट उत्पादकांकडून आधीच बसवली जाते, त्यामुळे अशा वाहनधारकांना यासाठी पुन्हा प्रयत्न करावयाची गरज नाही.

1 एप्रिल 2019 पूर्वीचे वाहनधारक परिवहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करू शकतात.

या नंबर प्लेट बसवण्यासाठी राज्य सरकारने तीन अधिकृत कंपन्या नियुक्त केल्या आहेत. इतर कोणत्याही अनधिकृत विक्रेत्याकडून प्लेट बसवल्यास ती केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये नोंदवली जाणार नाही.

ही नंबर प्लेट बसवण्यासाठी वाहनधारकांनी 31 मार्च 2025 पर्यंत ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.

कोणतीही अडचण, शंका किंवा तक्रार असल्यास परिवहन विभागाच्या पोर्टलवर किंवा dytccomp.tpt-mh@gov.in या ईमेलवर संपर्क साधावा.

सुरक्षेसाठी आणि कायद्याचे पालन करण्यासाठी सर्व वाहनमालकांनी याला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.
स्वातंत्र्य न्युज – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *