ग्रामविकास व पंचायत राज विभागउमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
“नाशिक शहरात जिल्हास्तरीय मिनी सरस प्रदर्शनाचे भव्य आयोजन डोंगरी वस्तीगृह मैदानावर सुरू आहे. दिनांक 11 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत होणाऱ्या या प्रदर्शनात ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी आपल्या कर्तृत्वाने आणि कौशल्याने उत्पादित मालाची प्रदर्शने मांडली आहेत.
स्वयंपाकघरातील आरोग्यदायी व घरगुती पदार्थांपासून ते हस्तकलेच्या वस्तूंवर ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या उपक्रमाचा उद्देश सकस आहाराला चालना देणे आणि ग्रामीण महिलांना शहरी भागात बाजारपेठ उपलब्ध करून देणे आहे. 15 जानेवारीला होणाऱ्या बायर-सेलर मीटमुळे महिला उद्योजकांसाठी मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.
ग्रामीण महिलांच्या कौशल्याला वाव देणारे हे प्रदर्शन नाशिककरांसाठी एक आगळावेगळा अनुभव ठरणार आहे. याचा लाभ घेत मोठ्या प्रमाणात बाजार करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्वातंत्र्य न्यूज – न्यायासाठी लढणारी बातमी.*