swatantryanews.com

Blog Post

swatantryanews.com > News > व्हिडिओ > ‘छावा’ चित्रपटाने संभाजी महाराजांचा खरा इतिहास उजागर! CM फडणवीस |

‘छावा’ चित्रपटाने संभाजी महाराजांचा खरा इतिहास उजागर! CM फडणवीस |

मुंबई, ५ मार्च २०२५ – छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे खरे रक्षक होते. इतिहासकारांनी त्यांच्यावर अन्याय केला, मात्र ‘छावा’ चित्रपटाने हा अन्याय दूर करत त्यांच्या शौर्याचा खरा इतिहास मांडला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

📌 नरिमन पॉईंट, आयनॉक्स थिएटरमध्ये महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधिमंडळ सदस्य व मंत्र्यांसाठी ‘छावा’ चित्रपटाचा खास शो आयोजित केला.

📌 या वेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, जयकुमार रावल, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि अभिनेते सयाजी शिंदे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

📌 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “संभाजी महाराज ११ भाषा अवगत असलेले संस्कृत पंडित, कवी आणि लेखक होते. ‘छावा’ चित्रपटाने त्यांचे शौर्य आणि विद्वत्ता जनसामान्यांपर्यंत पोहोचवली.”

📌 यावेळी चित्रपटातील प्रमुख कलाकार संतोष जुवेकर आणि प्रोडक्शन टीमचे संजय पाटील यांचा छावा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

📌 अभिनेते संतोष जुवेकर यांनी मनोगत व्यक्त करत चित्रपट टीमचे आणि उपस्थितांचे आभार मानले.

#swatantryanews#marathinews#maharashtra#

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *