भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने अविनाश आहेर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय माने साहेब होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेच्या हेमलता पाटील उपस्थित होत्या . जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हुतात्मा स्मारक मध्ये १९ फेब्रुवारी दुपारी १२ वाजेला छत्रपती शिवाजी महाराज आणि संतशिरोमणी रोहिदास महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात विविध मान्यवरांनी हजेरी लावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची देवाण घेवाण केली, तसेच शिरोमणी महाराजांचे कार्य देखील सांगीतले .
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि संतशिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाली.
इतिहासाच्या पुनरावलोकनाने समाजप्रबोधन
ओबीसी समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या संत रोहिदास महाराजांच्या विचारधारेवर आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यस्थापनेच्या कार्यावर विचारमंथन करण्यात आले. यावेळी अँड. राजेन्द्र खंदारे, श्याम ओझरकर, सुरेश पवार , नीलिमा साठे , डॉ. अशोक काळे, डॉ. किरण पाटील, विजय मोरे, गोरख कोरडे ,आदी मान्यवरांनी ऐतिहासिक घटनांवर प्रकाश टाकत समाजाला दिशादर्शन केले.
सांस्कृतिक कार्यक्रम व समाजसुधारकांचा गौरव
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात शिवाजी महाराजांचा पोवाडा शाहीर नेटावटे यांनी सादर केला तर संत शिरोमणी यांचा पोवाडा वामन दादा आहिरे यांनी सादर केला . सामाजिक परिवर्तन घडवणाऱ्या व्यक्तींचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला. तसेच, शिक्षक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक आणि युवा नेते यांचा सन्मान करण्यात आला.
समाजप्रबोधन, ऐतिहासिक सत्य शोध आणि युवकांसाठी प्रेरणादायी उपक्रम राबवण्याची घोषणा व शपथ यावेळी घेण्यात आली.
— प्रतिनिधी, स्वातंत्र्य न्यूज – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी