नाशिकमध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र, महानगर तर्फे राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम हुतात्मा स्मारक, जिल्हा अधिकारी कार्यालय समोर नाशिक येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ग्राहक जागृती, फसवणूक रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या तसेच ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक विभागाचे कोषाध्यक्ष अँड. राजेंद्र खंदारे होते, तर सहसंघटक अँड. सुरेंद्र सोनवणे, श्री. प्रशांत देशमुख व अन्य मान्यवरांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
अँड. राजेंद्र खंदारे यांनी ग्राहक दिनाच्या आयोजनाचे महत्त्व विशद करताना ग्राहक हक्क, कर्तव्ये, व खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ग्राहकांच्या उदासीनतेमुळे फसवणुकीचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले .
अँड. सुरेंद्र सोनवणे यांनी ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी स्पष्ट केल्या. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार व आर्थिक प्रलोभनांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी ग्राहकांनी सजग राहण्याचे आवाहन केले.
प्रशांत देशमुख यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल करण्याच्या पद्धतींबद्दल माहिती दिली.
संतोष गायकवाड यांनी वैद्यकीय क्षेत्रातील फसवणूक व त्यावरील उपाय सांगितले
हरीश वाघ यांनी शैक्षणिक क्षेत्रातील समस्या व विद्यार्थी पालकांच्या समस्या उपयुक्त उपाय सांगितले.
नवीन गंगावणे यांनी ग्राहकांच्या तक्रारींच्या सोडवणुकीसाठी मध्यस्थ कक्षाचा उपयोग बद्दल माहिती दिली.
ऑनलाइन फसवणूक, बँकिंग गैरव्यवहार ग्राहकांनी सतर्क रहावे.
फसव्या जाहिरातींना बळी न पडण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले .
नागरिकांनी माहिती अधिकार कायद्याचा उपयोग करण्याचे महत्त्व अधोरेखित केले
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. विनोद अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. महेश परदेशी यांनी केले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवर
अँड. राजेंद्र शेवाळे, अँड. हेमंत दाते, स्वप्नील गोवर्धने, राजेंद्र नानकर, विठोबा द्यानद्यन, दिलीप निकम, संतोष जाधव, भाऊराव बच्छाव, विशाखा शेवाळे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
“सजग ग्राहक, सुरक्षित ग्राहक” या मंत्रासह कार्यक्रमाचा यशस्वी समारोप करण्यात आला.
स्वातंत्र्य न्युज – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी