आता गटई कामगारांना सन्मानाने व्यवसायाची संधी!
सामाजिक न्याय विभागाची क्रांतिकारी योजना: पात्रांना मोफत पत्र्याचे स्टॉल मिळणार .
बातमी नाशिक, विभागाची…
चामड्याच्या वस्तू आणि पादत्राणे दुरुस्त करणाऱ्या गटई कामगारांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने महत्त्वाची योजना राबवली आहे. अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाच्या व्यक्तींच्या आर्थिक उन्नतीसाठी व त्यांच्या व्यवसायाचे संरक्षण करण्यासाठी 100% अनुदानावर पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र कामगारांनी 31 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन नाशिकच्या समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी केले आहे.
योजनेच्या महत्त्वपूर्ण अटी जाणून घेऊ.
अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी व अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात ₹40,000 व शहरी भागात ₹50,000 पेक्षा जास्त नसावे.
अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
स्टॉलसाठी मागितलेली जागा अधिकृत ताब्यात असावी किंवा स्वमालकीची असावी.
रहिवासी प्रमाणपत्र व आधारकार्ड आवश्यक.
या योजनेचा पूर्वी लाभ घेतलेला नसावा.
अर्ज तुम्ही करू शकतात,सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, नासर्डी पुलाजवळ, नाशिक पुणे रोड येथे सादर करावा. योजनेविषयी अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.
स्वातंत्र्य न्यूज: न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी!
#swatantryanews#marathinews#maharashtra#