swatantryanews.com

Blog Post

swatantryanews.com > News > आरोग्य सेवा > केईएम रुग्णालयाच्या ९९व्या वर्धापन दिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा.|

केईएम रुग्णालयाच्या ९९व्या वर्धापन दिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा.|

मुंबईकरांचे आधारवड ठरलेल्या केईएम रुग्णालयाच्या ९९व्या वर्धापन दिन सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णसेवेसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्याची घोषणा केली. रुग्णालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्यात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार कालिदास कोळंबकर, सुनील शिंदे आणि मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि ,

रुग्णांना जागेची कमतरता भासू नये म्हणून शताब्दी महोत्सवी वर्षात आयुष्मान शताब्दी टॉवर उभारण्यात येणार आहे. यामुळे रुग्णांना अधिक सुविधा उपलब्ध होतील.

औषधांसाठी बाहेर धावपळ करावी लागू नये, यासाठी झिरो प्रिस्किप्शन पॉलिसी लागू केली जाणार आहे. रुग्णालयातच आवश्यक औषधांची व्यवस्था केली जाईल.

रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये म्हणून खास सोयी-सुविधा निर्माण केल्या जातील.

डॉक्टरांच्या ऐतिहासिक योगदानाचा सन्मान करण्यासाठी रुग्णालयात म्युझियम उभारण्याचा प्रस्तावही देण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्धापन दिन स्मरणिकेचे आणि वार्षिक अहवालाचे प्रकाशन देखील करण्यात आले.
स्वातंत्र्य न्युज – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *