कामगार सुरक्षा कायदे केवळ कागदावर? — नाशिकमध्ये दोन कामगारांचे प्राण गेले, आता न्याय मिळेल का?
राहू हॉटेल समोर पवन नगर हाईट्स पेठ रोड नाशिक येथे २१ /२ /२०२५ रोजी सकाळी ८.३० वाजेला तरुणाचा बिल्डिंग वरून पाय घसरून तळमजल्यावर पडल्याने मृत्यू झाला आहे.
मयत कामगाराचे नाव किरण खंडेराव अंभोरे असून वय 20 . तालुका सेलू जिल्हा परभणी येथील तरुण कामासाठी नाशिक येथे कार्यरत असताना ही दुर्दैवी घटना घडली.
याच वेळी बीश्वजीत मोहंनजीत बीश्वा वय २० पश्चिम बंगाल येथील रहिवासी असून, नाशिक येथील आरडी सर्कल जवळील विराज ईस्टेट नवीन बांधकाम इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून जमिनीवर पडल्याने दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. विराज इस्टेट , क्युलियन पार्क येथे २१/०२/२०२५ रोजी सकाळी ८.३० लाच या देखील कामगार तरुणाचा मृत्यू झाला .
एकाच दिवशी एकाच वेळी दोन कामगार गेल्याने कामगारांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
अशा घटना थांबण्याचे नाव घेत नाही आहे, एकामागे एक अशा
दरवर्षी अनेक कामगारांचे असे मृत्यू होतात याला नक्की जबाबदार कोण? असे प्रश्न नाशिकर विचारत आहेत.
१) प्रश्न हा आहे . सेफ्टी किट घालने कंत्राटदार अथवा मालक बंधनकारक का करत नाहीत ?
का उपलब्धच करून देत नाही?
२) माथाडी कामगार कल्याण महामंडळ नोंदणी या प्रोजेक्ट्स आस्थापनांची झाली आहे का? कामगारांचे चलन ते भरतात का?
३) PF, ESIC, ईश्रम कार्ड, कामगार कल्याण महामंडळ नोंदणी अशा अनेक कामगारांच्या हिताच्या योजना त्यांना मिळतात का?
४) जर हे सर्व सरकारी नियम लागू आहेत तर पडताळणी करण्याचे काम कोणत्या अधिकाऱ्याचे आहे ? जर आहे तर ते अधिकारी पडताळणी साठी, अशा ठिकाणी अगोदरच का जात नाहीत?
राज्य शासन व केंद्र शासन यांचे सर्व नियम धाब्यावर ठेवून संबंधित मालक कंत्राटदार हे अधिकारी वर्गाला आपले पार्टनर करत असल्याची चर्चा सर्वसामान्य कामगारांमध्ये सुरू आहे. कामगार तक्रार करण्यासाठी पुढे येऊ शकत नाही असे कामगारांचे म्हणणे आहे.
स्वातंत्र्य न्युज – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी.