swatantryanews.com

Blog Post

swatantryanews.com > News > बातमी फोटो > आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ‘चौराहा – एक बहुभाषिक काव्यसंध्या’|

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ‘चौराहा – एक बहुभाषिक काव्यसंध्या’|

मुंबई, दि. ६ : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ‘चौराहा – एक बहुभाषिक काव्यसंध्या’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य शासनातील वरिष्ठ महिला अधिकारी स्वतःच्या कविता सादर करणार असून, हा सांस्कृतिक सोहळा ७ मार्च रोजी संध्याकाळी ६.०० वाजता नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाबद्दल माहिती देताना एनसीपीएच्या ग्रंथालय प्रमुख डॉ. सुजाता जाधव म्हणाल्या की, या काव्यसंध्येत राज्याच्या विविध प्रशासनिक विभागांतील महिला अधिकारी आपल्या साहित्यिक प्रतिभेचे दर्शन घडवणार आहेत. यामध्ये मुख्य सचिव सुजाता सौनिक, कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा, मुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदन आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या संचालक निधी चौधरी या मान्यवर महिला अधिकारी कविता सादर करणार आहेत.

साहित्य आणि काव्यविश्वाचा ऐतिहासिक प्रवास
एनसीपीएच्या पहिल्या महिला संचालक विजया मेहता यांनी २० वर्षांपूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात केली होती. या उपक्रमाचे पुनरुज्जीवन होत असून, ‘चौराहा’ काव्यसंध्या ऐतिहासिक साहित्य उपक्रमाच्या नव्या पर्वाचे प्रतीक ठरणार आहे. ‘एनसीपीए’च्या “पेज टू स्टेज” या उपक्रमाचा एक भाग म्हणून साहित्याला रंगमंचावर सादर करण्याच्या संकल्पनेतून ‘चौराहा’ हा कार्यक्रम नव्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर येत असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला अधिकारी आणि साहित्यप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या या काव्यसंध्येची उत्सुकता सर्वत्र आहे. या कार्यक्रमाद्वारे महिला अधिकारी आपल्या साहित्यिक दृष्टिकोनातून समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी योगदान देत आहेत.

#swatantryanews#marathinews#maharshtra#

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *