अनुसूचित शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी!
31 डिसेंबरपर्यंत अर्ज करा; जिल्हा परिषद कृषी विभागाच्या योजना उपलब्ध
अनुसूचित जाती व जमातीतील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी व शेतीक्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या अंतर्गत सन 2024-25 साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे यांनी केले आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी 31 डिसेंबर 2024 पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर (www.mahadbt.maharashtra.gov.in) नोंदणी करावी असे आव्हान करण्यात आले आहे.
यासाठी अटी व शर्ती:
अर्जदार अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीतील शेतकरी असावा.
सक्षम प्राधिकाऱ्याचे जात प्रमाणपत्र आवश्यक.
लाभासाठी अर्जदाराकडे 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर जमीन असावी (विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर).
7/12 उतारा व बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे बंधनकारक.
लाभार्थी शेतकरी नगर पंचायत/महानगरपालिका क्षेत्राबाहेरील असावा.
योजना व अनुदान मर्यादा: अशी असणारं आहे.
नवीन विहिरीसाठी: ₹4 लाख
जुनी विहिरीच्या दुरुस्तीसाठी: ₹1 लाख
ठिबक व तुषार सिंचनासाठी: ₹97 हजार व ₹47 हजार
शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण: ₹2 लाख किंवा 90% खर्च
सोलर पंपासाठी: ₹50 हजार
यंत्रसामग्री (बैल/ट्रॅक्टरचलित): ₹50 हजार
याशिवाय, 50% अनुदानावर ट्रॅक्टर, रोटॅव्हेटर, कडबाकुट्टी यंत्र व विद्युत पंप यांसाठीही अर्ज करता येईल.
शेतकऱ्यांनो, शेतीला बळकट करण्यासाठी या संधीचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्याच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधा!
स्वातंत्र्य न्यूज: न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी!